Personalized
Horoscope

राशि भविष्य 2020 - Rashi Bhavishya in Marathi

नवीन वर्ष म्हटले की, नवीन अपेक्षा नवीन गोष्टी व नवीन प्लॅन सर्वच जण ठरवून असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही कमतरता असतात आणि प्रत्येकाला वाटते की, आपले येणारे वर्ष हे आपल्या आयुष्यातील कमतरता दूर करेल आणि आयुष्यात उत्तम आणि चांगल्या गोष्टी होतील आणि जीवन आनंदी होईल. वैदिक ज्योतिष शास्त्रात नक्षत्राला एकूण बारा राशींमध्ये वाटले गेले आहे. बारा राशींच्या आधारावरच ज्योतिष कुठल्या ही व्यक्तीचे भविष्य सांगतात व त्यावर आपण काय उपाय करू शकतो याचे मार्गदर्शन करतात. आज आम्ही तुम्हाला 2020 साठी सर्व राशीचे राशिभविष्य सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला कल्पना येईल की, तुमचे येणारे 2020 वर्ष कसे येईल त्यात तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे आणि कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी शुभ असेल त्यानुसार तुम्ही तुमचे पुढील वर्षीच्या कल्पना आखू शकतात आणि नवीन वर्षाचे भरपूर स्वागत करून येणारे वर्ष उत्तम जाण्याची अपेक्षा करू शकतात. पाहूया 2020 चे राशिभविष्य!

मेष राशि भविष्य 2020 (Mesh Rashi Bhavishya 2020)

Mesh Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष मेष राशीतील व्यक्तींसाठी सामान्य असेल. या वर्षी तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा पाहायला मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्थिती वर्षाच्या सुरवातीत खूप चांगली राहील परंतु वर्षाच्या मध्यात प्रॉपर्टीच्या संबंधित घरातील वरिष्ठ लोकांसोबत वाद होऊ शकतो. राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुम्ही कुणाला ही कर्ज देऊ नका आणि घेऊ नका तसेच कुठे प्रवासास गेल्यास आरोग्याची काळजी घ्या प्रवासात काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून काळजी घ्या. मुलांकडून या वर्षी चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात काही शुभ कार्य होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.

वृषभ राशि भविष्य 2020 (Vrishabha Rashi Bhavishya 2020)

Vrishabha Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष वृषभ राशीतील व्यक्तींसाठी सुरवातीला जरी ठीक ठाक असले तरी वर्षाचा मध्य आणि शेवट बराच उत्तम असेल. वर्षाच्या सुरवातीत तुम्ही तणावात येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या येण्याची शक्यता आहे. तुमची कौटुंबिक स्थिती खराब होऊ शकते. वर्षाच्या मध्यात तुम्हाला उत्तम नोकरीची संधी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात परिवर्तन पाहायला मिळेल. तुम्ही कामाच्या संधर्बात परदेशात जाण्याची शक्यता आहे. राशि भविष्य 2020 च्या अनुसार ज्यांना मुल नाहीत त्यांना या वर्षी मुल होण्याचे योग आहेत. सप्टेंबर महिना आव्हानात्मक राहू शकतो या काळात कुठलीही नवीन गोष्ट करू नका किंवा कुणाला कर्ज देऊ नका. वैवाहिक जीवनात काही ही अडचणी येणार नाही तुम्ही आनंदी राहाल घरात तुमचा मान सन्मान वाढेल आणि प्रत्येक मोठ्या कामामध्ये तुमचे मत घेतले जाईल.

मिथुन राशि भविष्य 2020 (Mithun Rashi Bhavishya 2020)

Mithun Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष मिथुन राशीतील व्यक्तींसाठी आनंदी असेल. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम यश देईल. ऑक्टोबर पासून डिसेंबर पर्यंतचा वेळ तुम्ही आपल्या धैयाकडे पोहचू शकतात. कुटुंबातील सर्वांकडून तुम्हाला प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. या वर्षी आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष उत्तम फळ देणारे आहे. राशि भविष्य 2020 अनुसार ह्या वर्षी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही हे वर्ष चांगले असणारे आहे आणि तुमची या वर्षी पद उन्नती ही होऊ शकते. या वर्षी कुटुंबातील सदस्य व्यवसायात धन गुंतवू शकतात. या वर्षी मध्यात आरोग्य विषयक समस्या येऊ शकतात परंतु वर्षाच्या शेवटी अशी कुठली ही आरोग्य विषयक समस्या तुम्हाला जाणवणार नाही.

कर्क राशि भविष्य 2020 (Kark Rashi Bhavishya 2020)

Kark Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष कर्क राशीतील व्यक्तींसाठी ठीक असेल परंतु या वर्षी त्यांना आरोग्य संबंधित समस्यांमधून जावे लागू शकते कारण त्यांचे रुटीन व्यस्त असल्याने त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होईल. त्यांना संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

वर्षाच्या मध्यात तुम्हाला पित्त संबंधित काही समस्या होण्याची शक्यता आहे. राशि भविष्य 2020 मध्ये तुमच्या प्रेमात वाढ होईल. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशीच तुमचा विवाह होण्याचे योग आहेत. तुम्हाला तुमच्या जिवलग मित्राकडून धोका होऊ शकतो. नोकरीमध्ये काही समस्या येऊ शकतात त्याचा तुम्हाला या वर्षी सामना करावा लागेल. या वर्षी तसेच तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर ही मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्य ठीक असेल. तुम्ही आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि मुलांकडून ही तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. सासरच्या पक्षाशी वाद टाळा.

सिंह राशि भविष्य 2020 (Simha Rashi Bhavishya 2020)

Simha Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष सिंह राशीतील व्यक्तींसाठी सुरवातीला खूप उत्तम असेल. तुम्हाला वर्षाच्या सुरवातीत परदेशात नोकरीसाठी ऑफर मिळेल. तुमची आर्थिक स्थिती या वर्षी मजबूत राहील. तुम्ही या वर्षी प्रॉपर्टी खरेदी करू शकतात तसेच ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंतचा वेळ थोडा निराशा जनक असू शकतो. या काळात तुमची किमती वस्तू हरवू शकते. मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे या वर्षी खूप गरजेचे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरात काही विधी होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना या वर्षी शिक्षणात उत्तम यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही या वर्षी उत्तम गुण मिळतील. राशि भविष्य 2020 मध्ये वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिती संबंधित समस्या येऊ शकतात. वर्षाच्या शेवटी तुम्हाला थोडा तणाव जाणवू शकतो परंतु तुम्ही आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

कन्या राशि भविष्य 2020 (Kanya Rashi Bhavishya 2020)

Kanya Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार ह्या वर्षी कन्या राशीतील व्यक्तींचे स्वास्थ्याच्या बाबतीत भाग्य सोबत राहील. पूर्ण वर्ष तुम्हाला प्रसन्न आणि क्रियाशील वाटेल. या वर्षी तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहण्याची शक्यता आहे. कारण तुमचा विश्वास तुमच्या प्रियकर/ प्रियसी सोबत अधिक वाढेल. या वर्षी तुमच्या पार्टनरला त्याच्या नोकरीमध्ये पद उन्नती मिळू शकते त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. राशि भविष्य 2020 मध्ये तुम्हाला आर्थिक दृष्टीने लाभ होईल. विद्यार्थ्यांना ही त्यांच्या शिक्षणात उत्तम यश संपादन होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळू शकते. या वर्षी तुम्हाला तुमच्या मित्रांची साथ मिळेल आणि हे वर्ष निरोगी राहण्याची शक्यता आहे.

तुळ राशि भविष्य 2020 (Tula Rashi Bhavishya 2020)

Tula Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार तुळ राशीतील व्यक्तीचे स्वास्थ्य काही समस्याकारक असू शकते. पोट संबंधित विकार तसेच मानसिक तणाव सारखे आजार या वर्षी तुम्हाला खूप त्रास देण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. वर्षाच्या शेवटी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात या वर्षी काही आरोप प्रत्यारोप होऊ शकतात त्यामुळे तुम्ही काही दिवसासाठी माहेरी जाण्याची शक्यता अधिक आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सतर्क राहा. कारण पार्टनर कडून धोका मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे आयुष्य वर्षाच्या सुरवातीत नाजूक राहील परंतु, यानंतर स्थिती सामान्य होईल. राशि भविष्य 2020 मध्ये तुमच्या मुलांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी बराच पैसा खर्च कराल.

वृश्चिक राशि भविष्य 2020 (Vrishchik Rashi Bhavishya 2020)

Vrishchik Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार वृश्चिक राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली राहील परंतु मध्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमची कमाई वाढू शकते अथवा तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक लोकांचे जीवन उत्तम असू शकते आणि आर्थिक स्थिती वर्षाच्या मध्यात थोडी बेताची होऊ शकते. परंतु सप्टेंबर महिन्यानंतर सर्व सुरळीत होईल. तुमच्या कुटुंबात कुठल्या गोष्टीला घेऊन ताणाताणी किंवा भांडण होऊ शकतात. जोडीदारा सोबत तुम्ही चांगली वेळ घालवाल. राशि भविष्य 2020 मध्ये जे लोक अविवाहित आहे त्यांचे या वर्षी लग्न होण्याचे योग आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी मनासारखे रिजल्ट मिळतील आणि मनासारख्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळेल. कुटुंबात परिस्थिती चांगली राहावी यासाठी प्रयत्न करा कुणासोबत वाद घालू नका हेच तुमच्यासाठी योग्य असेल.

धनु राशि भविष्य 2020 (Dhanu Rashi Bhavishya 2020)

Dhanu Rashi Bhavishya 2020धनु राशीच्या व्यक्तींना राशि भविष्य 2020 मध्ये करिअरसाठी बरीच मेहनत करण्याची आवश्यकता असेल. वर्षाच्या सुरवातीमध्ये नोकरीविषयक समस्या येऊ शकतात परंतु काही काळानंतर स्थिती व्यवस्थित होऊन जाईल. या वर्षी कुटुंबातील लोकांसोबत काही वाद होऊ शकतो. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगली वेळ घालवाल. आर्थिक स्थिती वर्षाच्या सुरवातीमध्ये थोडी आव्हानात्मक राहील परंतु वर्षाच्या मध्यात पैसा येईल तथापि, तुमच्या जवळ पैश्याची काहीच कमतरता नसेल परंतु दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की, तुमच्या हातात पैसा टिकत नाही. शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या विद्यार्थ्यांना राशि भविष्य 2020 मध्ये निराशा होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी चांगले गुण मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने धनु राशीतील व्यक्ती स्वतःला खूप लकी मानतील. तुम्हाला कुठले ही आजार होणार नाही त्यापासून मुक्ती मिळेल.

मकर राशि भविष्य 2020 (Makar Rashi Bhavishya 2020)

Makar Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींचे करिअर वर्षाच्या सुरवाती मध्ये बरेच चांगले राहील. नोकरीची नवीन संधी ही तुम्हाला मिळेल. नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत तुम्ही तुमच्या बॉस सोबत परदेश यात्रेवर जाऊ शकतात. पैश्याची कमतरता या वर्षी तुम्हाला अजिबात वाटणार नाही. कुटुंबात तुमचा मान सन्मान सोबतच तुमची जबाबदारी ही वाढेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमच्या जीवनात जोडलेल्या बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला मेहनत करावी लागेल. प्रेम जीवन अनुकूल राहील आणि जे लोक अविवाहित आहेत त्यांचे राशि भविष्य 2020 या वर्षी लग्नाचे योग आहेत. मुलांकडून या वर्षी तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन बऱ्या पैकी चांगले राहील आणि तुम्हाला मान तसेच सन्मान प्राप्ती होईल. वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहू शकते.

कुंभ राशि भविष्य 2020 (Kumbh Rashi Bhavishya 2020)

Kumbh Rashi Bhavishya 2020राशि भविष्य 2020 च्या अनुसार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी वर्ष 2020 मध्ये बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कमाई वाढण्या-सोबत खर्च ही तितकाच होईल. या वर्षी तुम्हाला अध्यात्माने जोडलेले अनेक चांगले अनुभव मिळतील. कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक स्थळी भेट देऊ शकतात. राशि भविष्य 2020 च्या अनुसार शाळा आणि कॉलेज स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांना या वर्षी बरीच मेहनत करण्याची आवश्यकता आहे. तथापि आपल्या देशात शिक्षण प्राप्त करण्याऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. मुलांकडुन तुमची नाराजी होऊ शकते.

मीन राशि भविष्य 2020 (Meen Rashi Bhavishya 2020)

Meen Rashi Bhavishya 2020मीन राशीच्या व्यक्तींसाठी राशि भविष्य 2020 हे शुभ वर्ष आहे. या वर्षी तुम्ही नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरु करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला उत्तम यश ही मिळेल. या वर्षी तुम्ही नवीन मित्र बनवाल. हे मित्र तुमच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावतील. प्रॉपर्टीच्या गोष्टींना घेऊन कुटुंबात वाद होऊ शकतो. परंतु तुम्ही आपल्या समजदारीने वागून सर्व अडचणी सोडवाल. मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल ज्या कारणाने तुमचे बिघडणारे काम पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती राशि भविष्य 2020 च्या अनुसार मजबुत असेल तरी ही खर्चावर नियंत्रण ठेवा.